पवार राजीनामा परत घेणार का?; जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितलं काय करणार?
शरद पवार यांनी राजीनामा देऊन आज तीन दिवस होत आहेत. त्यांचं मन वळविण्याचे सुरू आहे. तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करत आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचे नेतृत्व करावे अशीच विनंती केली आहे. तर राजीनामा मागे घेण्यासाठी पक्ष पवारांचे मन वळवण्याचही प्रयत्न केला जात आहे. याच बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जात असताना त्यांनी आपण काय करणार असल्याचे स्पष्टच सांगितलं. शरद पवार यांनी राजीनामा देऊन आज तीन दिवस होत आहेत. त्यांचं मन वळविण्याचे सुरू आहे. तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करत आहेत. मात्र शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावेळी आपण कार्यकर्त्याच्या भावना मी त्यांच्यापर्यत पोहचविल्या आहेत. तर पवार यांनी राजीनामा परत घ्यावा यासाठी आपण आग्रह केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.