Maharashtra Politics: ‘त्यांची चूल विझली? आम्ही नवीन चुलं’, राऊत यांना शिंदे गटाच्या नेत्याचा टोला
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीच थेट बंड करत राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा सांगितला. तसेच दुरारी राजभवनवर जात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. इतकच काय तर आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीच सोबत इतर 8 जणांनाही मंत्री केलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून बंडाची चिन्ह दिसत होती. काल त्याता किनार मिळाली. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीच थेट बंड करत राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला दावा सांगितला. तसेच दुरारी राजभवनवर जात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. इतकच काय तर आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीच सोबत इतर 8 जणांनाही मंत्री केलं. त्यावरून भाकरी आणि चूक याची जोरदार चर्चा रंगली आहे. यावरूनच ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाना साधला होता. तर नवीन चूल म्हणत टीका केली होती. त्या टीकेली शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी पलटवार केला आहे. त्यांनी, राऊत यांची चूल विझली आहे. हे नक्की झालं आहे. त्यांची चूल विझली आहे ना मग आम्ही नवीन चुलीवरती काहीही करू किंवा गॅसवरती भाकरी करू. आमची भाकरी करपणार नाही हे मात्र नक्की. तर आमची भाकरी भाजल्याही जाईल आणि चांगल्या प्रकारे लोकांना चारल्याही जातील असं प्रत्युत्तर दिलं आहे.