भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची पहिली सभा; पवार नेमकं काय बोलणार?
तर शरद पवार हे आता थेट मैदानात उतरले असून ज्यांनी राष्ट्रवादी फोडली त्यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे. आज शनिवारी (ता. ८) त्यांची कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात पहिली सभा होणार आहे.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात जोरदार शक्तीप्रदर्शन आणि आरोप-प्रत्यारोप पहायला मिळतक आहेत. तर शरद पवार हे आता थेट मैदानात उतरले असून ज्यांनी राष्ट्रवादी फोडली त्यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे. आज शनिवारी (ता. ८) त्यांची कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात पहिली सभा होणार आहे. ही दुपारी ४ वाजता येवला बाजार समितीच्या पटांगणात होणार आहे. तर पवार या सभेत काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर या सभेसाठी जिल्ह्यात शरद पवार समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. याचदरम्यान याच्याआधी भुजबळ यांनी पवार यांच्यावर टीका करताना, वसंतदादा पाटील, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरण देत त्यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं होतं. त्यानंतर आता पवार पहिलीच सभा भुजबळ यांच्या मतदारसंघात घेत आहेत.