‘केंद्राच्या यादीत रायगड 100 व्या स्थानी’, रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल
तर सध्या बचावकार्य सुरू झालं आहे. तसेच यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाना साधला आहे. तर ठाकरे गटाकडून देखील टीका केली आहे. याचमुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
रायगड, 20 जुलै 2023 | रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने राज्यात दुखाचे वातावरण आहे. तर सध्या बचावकार्य सुरू झालं आहे. तसेच यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाना साधला आहे. तर ठाकरे गटाकडून देखील टीका केली आहे. याचमुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी, जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना श्रद्धांजली, पण जे आडकले आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण हे करत असताना अशी घटना पुढे होऊ नये याची दक्षता सरकारणं घ्यायला हवी असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी फेब्रुवारीमध्येच दरड कोसळण्यावरून एक रिपोर्ट इस्त्रोकडून करण्यात आला होता. जो केंद्राकडे देण्यात आला होता. ज्यात देशातील 100 पेक्षा अधिक भागात भूस्खलन होणाऱ्या ठिकाणांची माहिती केंद्राला दिली आहेत. तर ज्या भागात घटना घडली तो भाग या अहवालात 100 व्या नंबरवर आहे. कदाचित त्याची एक प्रत राज्य सरकारला देखील आली असावी. पण यावर राज्य सरकारने आभ्यास केला का असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.