Karnataka Election Result : कर्नाटकात पवार यांना झटका लागणार? निपाणीत सध्या काय स्थिती?

Karnataka Election Result : कर्नाटकात पवार यांना झटका लागणार? निपाणीत सध्या काय स्थिती?

| Updated on: May 13, 2023 | 12:27 PM

त्यामध्ये एकीकरण समितीने जाहीर केलेल्या निपाणी मतदारसंघातून उत्तम रावसाहेब पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याचा फटका आता मराठीच उमेदवाराला बसताना दिसत आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर आपलं लक्ष कर्नाटक निवडणुकीवर केंद्रीत केलं. तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकी मध्ये ५० जागा लढवण्याचे जाहीर केले. मात्र पण निवडून येण्याची क्षमता असलेल्या ९ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्ये एकीकरण समितीने जाहीर केलेल्या निपाणी मतदारसंघातून उत्तम रावसाहेब पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याचा फटका आता मराठीच उमेदवाराला बसताना दिसत आहे. या निवडणुकीत एकीकरण समितीचा तर सुपडा साफ होताना दिसत असतानाच आतचा पवार यांना देखील झटका बसणारा निकाल येण्याची शक्यता आहे. येथे उत्तम पाटील हे प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आघाडीवर होते. या मतदारसंघात भाजपच्या शशिकला जोल्ले आणि काँग्रेसचे काकासाहेब पाटील हे देखील लढत देत आहेत. मात्र आता त्यांची 3500 मतांनी पिच्छेहाट झाली आहे.

Published on: May 13, 2023 12:27 PM