“पाहुण्यांना जेवायला वाढलं आता आता बघूया घरच्याकडे कवा लक्ष देता?” शिंदे-फडणवीस यांना खोत यांचा सवाल

“पाहुण्यांना जेवायला वाढलं आता आता बघूया घरच्याकडे कवा लक्ष देता?” शिंदे-फडणवीस यांना खोत यांचा सवाल

| Updated on: Jul 04, 2023 | 4:50 PM

तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री आणि इतर 8 राष्ट्रवादी नेत्यांचा शपथविधी पार पडला आणि शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र यामुळे शिंदे गट, भाजप आणि युतितील मित्र पक्ष नाराज झाल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबई : काल राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश झाला. तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री आणि इतर 8 राष्ट्रवादी नेत्यांचा शपथविधी पार पडला आणि शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र यामुळे शिंदे गट, भाजप आणि युतितील मित्र पक्ष नाराज झाल्याचे पहायला मिळत आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्यांनी सरकारमध्ये आणि युतीमध्ये प्रवेश केला त्यांचे आपण स्वागत करत असल्याचं म्हटलं. तर पावना नाराज होऊ नये म्हणून आधी त्याला जेऊ घालायचं असतं. तशी गावगाड्यातील रित असते. त्यामुळे पाहुण्यांना पहिल्या पंक्तीला बसवलं, जेवायला वाढलयं आता घरच्यांना वाढतील. त्यामुळे घरच्यांनी अपेक्षा धरून आपलं खुश राहायचं असा सल्ला वजा टोमना त्यांनी शिंदे गटासह भाजमधील आमदारांना तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तर पहिल्यांदा पाहुण्याला वाढायचं असतं आता वाढलं आता बघूया घरच्यांकडे कवा ध्यान देताय ते असा सवाल त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे.

Published on: Jul 04, 2023 04:50 PM