विरोधात बसून टीकाटिप्पणी करण्यापेक्षा अजितदादा सोबत येत असतील तर ती गोड बातमी

“विरोधात बसून टीकाटिप्पणी करण्यापेक्षा अजितदादा सोबत येत असतील तर ती गोड बातमी”

| Updated on: Apr 18, 2023 | 10:50 AM

Agriculture Minister Abdul Sattar on Ajit Pawar : मी कृषी खात्याच्या कामांसाठी दिल्लीत आलो आहे. मला इतर गोष्टी माहिती नाहीत, असंही सत्तार म्हणालेत.

नवी दिल्ली : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार सरकारसोबत येत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. विरोधात बसून टीकाटिप्पणी करण्यापेक्षा ते येत असतील तर ही गोड बातमी, असं अब्दुल सत्तार म्हणालेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर हे अवलंबून नाही. कोर्टाचा निर्णय अंतिम राहील. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वाद आहे का? हे समोर येत नाही तोपर्यंत मी बोलणं उचित नाही, असं अब्दुल सत्तार म्हणालेत. राज्य सरकारला कोणताच धोका नाही सरकार कार्यकाळ पूर्ण करणार, असा विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Apr 18, 2023 10:50 AM