सध्याच्या सरकारचं भाजपला ओझं झालंय; संजय राऊत यांचा निशाणा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील कथित घोटाळ्यावरही राऊत बोललेत. पाहा व्हीडिओ...
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.सध्याच्या सरकारचं भाजपला ओझं झालंय, असं संजय राऊत म्हणाले आहेत. मंत्री दादा भुसे यांनी 100 कोटी रूपयाचा अपहार केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी पुन्हा केला आहे. तर दुसरीकडे संजय राऊतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय. नागपूरमध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल उभं राहिलं. मी देवेंद्र फडणवीस यांचं मी अभिनंदन करतो.हे हॉस्पिटल उभं करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यांचं अभिनंदन!, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील कथित घोटाळ्यावरही राऊत बोललेत. राहुल कुल यांनी चौकशीला सामोरं जावं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
Published on: Apr 28, 2023 10:29 AM
Latest Videos