आम्हाला मतदान करा, अन्यथा…, अमित शाह कर्नाटकातील जनतेला धमकी देताहेत; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut : 13 मेनंतर देशात अन् राज्यात मोठ्या घडामोडी घडतील; संजय राऊत यांचं वक्तव्य. राजकीय वर्तुळात चर्चा, पाहा व्हीडिओ...
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी राज्यात मोठ्या घडामोडी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवरही गंभीर आरोप केलेत. 13 मे नंतर देशात राज्यात मोठ्या घडामोडी घडतील. कर्नाटकात आम्हाला मतदान करा, अन्यथा दंगली होतील. अशी धमकी अमित शाह देत आहेत. हे गंभीर आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी सुट्टीवर असले तरी राज्य कधी सुट्टीवर जात नाही, असं म्हणत राऊतांनी शिंदेंना टोला लगावला आहे.विरोधी पक्षांच्या नेत्यांना 25 लाखांसाठी कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत. चौकशा केल्या जात आहेत. तर मग तुमच्या पक्षातील नेत्यांच्याही चौकशा करा. त्यांच्यावरही कारवाई करा, असंही राऊत म्हणालेत.
Published on: Apr 27, 2023 10:53 AM
Latest Videos