दादा भुसे यांनी 100 कोटींपेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार केलाय; संजय राऊत यांचे गंभीर आरोप
Sanjay Raut on BJP : भारतीय जनता पार्टीत भ्रष्ट लोकांची टोळी निर्माण झालीय, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बंदरे आणि खनिकर्म मंत्री तसंच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. “दादा भुसे यांनी 100 कोटीच्या पेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार केला आहे”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करताहेत? भीमा पाटस साखर कारखाना आणि दादा भुसे यांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण दिल्लीत ईडीकडे मांडणार आहे, असंही राऊत म्हणालेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही राऊतांनी टीका केलीय. “कोकणातले केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्यावर सोमय्यांनी 100 कंपन्या असल्याचा आरोप केला होता. त्यात तथ्य आहे. तेव्हा सोमय्या राज्यपालांकडे गेले होते. मला विचारायचंय की त्या केसचं पुढे काय झालं? नाहीतर आम्ही पुढे जाऊ, असंही राऊत म्हणालेत.
Published on: Apr 27, 2023 12:09 PM
Latest Videos