सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही- शरद पवार
Sharad Pawar on Swatantryaveer Savarkar : सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही; विरोधी पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांचं महत्वाचं वक्तव्य. आघाडीतील मित्रपक्षांचं म्हणणं काय? पाहा व्हीडिओ...
नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं सावरकरांबद्दलचं वक्तव्य अन् त्याला होणाऱ्या विरोधामुळे राजकारण तापलं आहे. काल रात्री राजधानी दिल्लीमध्ये विरोधीपक्षाची बैठक झाली. या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या मताला मित्र पक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा मी आदर करतो, असं म्हटलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस सावरकरांच्या मुद्द्याला बगल देणार का? राहुल गांधी सावरकरांचा मुद्दा टाळणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.