विजय वडेट्टीवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात भेट; चर्चांना उधाण, भेट नेमकी कशासाठी? पाहा…
काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी घेण्यात आली. याबाबत वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
नवी दिल्ली : माजी मंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकरही त्यांच्यासोबत होते. या भेटीवर वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी दिल्लीत आल्यानंतर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती त्यांच्या कानावर घातली, असं वडेट्टीवर म्हणाले. “बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा निर्णय हायकमांडचा आहे. प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय हायकमांडच घेतील”, असंही त्यांनी सांगितलं.
Published on: Feb 09, 2023 12:19 PM
Latest Videos