बेलापूर जेट्टी जवळ दोन बोटींना भीषण आग

बेलापूर जेट्टी जवळ दोन बोटींना भीषण आग

| Updated on: Mar 23, 2022 | 12:18 PM

बेलापूर जेट्टी जवळ दोन बोटींना भीषण आग (boat fire) लागल्याची घटना समोर आली आहे. बेलापूर (belapur) जेट्टी शेजारी दोन बोटी उभ्या होत्या.

नवी मुंबई :  बेलापूर जेट्टी जवळ दोन बोटींना भीषण आग (boat fire) लागल्याची घटना समोर आली आहे. बेलापूर (belapur) जेट्टी शेजारी दोन बोटी उभ्या होत्या. या बोटींना भीषण आग लागली आहे. या आगीत बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. या बोटी डिझेल (Dieselचोरी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या, ताब्यात घेतल्यानंतर या बोटींना बेलापूर जेट्टी जवळ लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बेलापूर आणि वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग लागताच अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने रौद्र रुप धारण केले. अग्निशमन दलाच्या जवांनकडून आग नियंत्रिण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Published on: Mar 23, 2022 12:18 PM