Breaking | मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाण, भाजपचे माजी नगरसेवक संदीप म्हात्रेला अटक

| Updated on: Jan 07, 2022 | 2:54 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray) यांच्याविषयी ट्वीट केल्याबद्दल भाजप पदाधिकारी जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांच्यावरील कारवाईचा प्रकार ताजा असतानाच आणखी एक अटक झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray) यांच्याविषयी ट्वीट केल्याबद्दल भाजप पदाधिकारी जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांच्यावरील कारवाईचा प्रकार ताजा असतानाच आणखी एक अटक झाली आहे. ठाकरेंविषयी लेखनाबद्दल संदीप म्हात्रे (Sandeep Mhatre) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांनी संदीप म्हात्रेंना अटक केली. म्हात्रेंनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसैनिकांनी पोलिात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी म्हात्रेंवर कारवाई केली.

Nagpur | उपमुख्यमंत्री ‘दादां’चा ठाकरे सरकारला विसर पडला?, राज्याच्या परिपत्रकात उल्लेखच नाही
Rajesh Tope | कोरोनावरील लस घ्या, अन्यथा… राजेश टोपे यांनी टीन-एजर्संना टोकलं