Special Report | लव्ह- जिहाद प्रकरणावरुन नवनीत राणा आक्रमक
लव जिहादच्या प्रकरणातून, हिंदू मुलीची फसवणूक झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी आणि राणांनी केला. त्यासंदर्भात नवनीत राणांनी राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये फोन केला. पण पोलिसांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप राणांनी केला.
अमरावती : मरावतीच्या खासदार नवनीत राणांनी, पोलिस स्टेशनमध्ये चांगलाच हंगामा केला. लव जिहादच्या प्रकरणातून, हिंदू मुलीची फसवणूक झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी आणि राणांनी केला. त्यासंदर्भात नवनीत राणांनी राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये फोन केला. पण पोलिसांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप राणांनी केला. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये राडाच पाहायला मिळाला. मुस्लीम तरुणानं 19 वर्षीय हिंदू तरुणीला पळवून नेल्याचा आरोप आहे. तरुणीला पळवून जबरदस्तीनं आंतरधर्मीय विवाह केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणंय. आरोपांनंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं, पण मुलीचा शोध लागलेला नाही
तरुणीच्या कुटुंबीयांनी नवनीत राणांकडे मदत मागितली. त्यासंदर्भात राणांनी राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनिष ठाकरेंना फोन केला असता फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप राणांनी केला. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि पोलीस निरीक्षक ठाकरेंसोबत नवनीत राणांचे शाब्दिक खटके उडाले.