Navneet Rana | उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, नवनीत राणांची जहरी टीका

Navneet Rana | उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, नवनीत राणांची जहरी टीका

| Updated on: Aug 26, 2022 | 5:41 PM

Navneet Rana | उद्धव ठाकरे यांच्यात दम नसल्याची जहरी टीका अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

Navneet Rana | उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यात दम नसल्याची जहरी टीका अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील आघाडीवरुन त्यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा लक्ष्य केले. राणा दाम्पत्य सातत्याने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जाहीर वक्तव्य करतात. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात त्यांनी यापूर्वी जहरी टीका केलेली आहे. प्रत्येक व्यक्ती बाहेर पडून संघर्ष करते. स्वतःला सिद्ध करते. संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) काम जोरदार आहे. त्यांना उभा महाराष्ट्र जाणतो, त्यांची प्रति आदर आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही. दम असता तर ते घरात बसले नसते असा खोचक टोला राणा यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर कारवाई केली होती. त्यांना मुंबईत अटक करण्यात आली होती. कोठडीत सन्मानीय वागणूक मिळाली नसल्याची ओरडही राणा यांनी केली होती.

Published on: Aug 26, 2022 05:41 PM