Video : माझ्याविरोधात लढा आणि जिंकून दाखवा, नवनीत राणा यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज
मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवेन. त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकूनही दाखवावी, असं देखील त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.
मुंबई : लिलावती रुग्णालयातू डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे यांना थेट चॅलेंज देत नवनीत राणा यांनी निवडणूक लढण्याचं आणि जिंकून दाखवण्याचं आव्हान दिलंय. मुंबई पालिकेत शिवसेनेविरोधात आपण प्रचार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातला कोणताही एक मतदारसंघ निवडावा. मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवेन. त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी आणि जिंकूनही दाखवावी, असं देखील त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. जेलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर उपचारासाठी लिलावती रुग्णालयात नवनीत राणा यांना दाखल करण्यात आलं होतं. अखेर ठणठणीत होऊन बाहेर आल्यावर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय.
Published on: May 08, 2022 12:03 PM
Latest Videos