नवनीत राणांनी केला एसटी बसने प्रवास; दुरवस्था पाहून म्हणाल्या...

नवनीत राणांनी केला एसटी बसने प्रवास; दुरवस्था पाहून म्हणाल्या…

| Updated on: Jun 14, 2023 | 12:01 PM

अमरावती बस स्थानकातील एसटीची खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी अमरावती ते वलगाव असा दहा किलोमीटरचा प्रवास एसटी बसने केला. सोमवारी मेळघाटात घाटालगत एसटी बस दरीत कोसळली होती; या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नव्हती. या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी पाहण केल्याची माहिती आहे.

अमरावती : अमरावती बस स्थानकातील एसटीची खासदार नवनीत राणा यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी अमरावती ते वलगाव असा दहा किलोमीटरचा प्रवास एसटी बसने केला. सोमवारी मेळघाटात घाटालगत एसटी बस दरीत कोसळली होती; या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नव्हती. या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी पाहण केल्याची माहिती आहे. यावेळी त्यांनी बसमधील प्रवाशांची संवाद साधला. “रिजेक्ट झालेल्या एसटी बस अमरावती जिल्ह्यासाठी पाठवल्या जातात, ग्रामीण भागात आणि आदिवासी भागासाठी भंगार बस पाठवतात”, असा आरोप केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. अमरावती बस स्थानक येथून वलगाव पर्यंत 10 किलोमीटरचा प्रवास नवनीत राणा यांनी एसटी बसने केला.

Published on: Jun 14, 2023 12:01 PM