मी कुणाच्याही बाजूची नाही, तर...; खासदार नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या?

“मी कुणाच्याही बाजूची नाही, तर…”; खासदार नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Aug 08, 2023 | 2:17 PM

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने मणिपूरचा मुद्दा लावून धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोलावं अशी मागणी होत आहे.अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी एकूण 12 तासांचा वेळ देण्यात आला आहे. या प्रस्तावाआधी खासदार नवनीत राणा यांनी सूचक विधान केलं आहे.

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 | पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने मणिपूरचा मुद्दा लावून धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर बोलावं अशी मागणी होत आहे. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान यावर चर्चा होणार. चर्चेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी एकूण 12 तासांचा वेळ देण्यात आला आहे. या प्रस्तावाआधी खासदार नवनीत राणा यांनी सूचक विधान केलं आहे. त्या म्हणाल्या की, ” खरंतर मला हसायला येतं. मी कुणाच्याही बाजूची नाही मी महिलांची खासदार आहे. लोकांच्या गरजेचे विषय भरकटून विरोधक भलत्याच गोष्टीवर गोंधळ घालत आहे. यातून त्यांची मानसिकता ओळखा. फक्त त्यांना मोदींचा विरोध करायचा आहे.”

 

Published on: Aug 08, 2023 02:17 PM