राणा दांपत्याचे अनधिकृत बांधकाम का पाडू नये

राणा दांपत्याचे अनधिकृत बांधकाम का पाडू नये

| Updated on: May 10, 2022 | 8:06 PM

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराची पाहणी केल्यानंतर नगरपालिकेला दिलेल्या आरखड्यापेक्षा त्यामध्ये बदल केल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.

मुंबई महानगरपालिकेने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खारमधील घराचे बांधकाम अवैध असल्याचे सांगत नोटीस बजावणयात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराची पाहणी केल्यानंतर नगरपालिकेला दिलेल्या आरखड्यापेक्षा त्यामध्ये बदल केल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या घरातील अनधिकृत बांधकाम का पाडू नये असा सवालही प्रशासनाने उपस्थित केला आहे. येत्या सात दिवसात स्पष्टीकरण दिले गेले नाही तर तर बांंधकाम का पाडू नये असा सवालही उपस्थित केला आहे.