Navneet Rana यांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे 24 तासांत राज्य सरकारकडुन उत्तर देण्याचे निर्देश
खासदार नवनीत राणा प्रकरणाबाबत 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत
नवी दिल्ली : सध्या कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आता कोठडीत (Police Custody) मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीच्या आरोपांवरून चर्चेत आल्या आहेत. त्यांना कोठडीत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. याबाबत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Speaker Om Birla) यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राची लोकसभा अध्यक्षांनीही तातडीने दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत, अशी माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या रिपोर्ट आधारे नोट द्यावी असेही आदेशात म्हटले आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारला याबाबत उत्तर द्यावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून जोरदार आरोप केले होते.