Special Report | राणांना खासदार नेमकं कुणी केलं?

| Updated on: Aug 22, 2022 | 2:05 AM

2019 ची लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपनं युतीत लढवली. या निवडणुकीत नवनीत राणांच्या विरोधात होते शिवसेनेचे आनंदराव अडसूळ. निवडणुकीत नवनीत राणांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. 

अमरावती : अमरावतीत राणा दाम्पत्यानं भव्य दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते. या उत्सवात नवनीत राणांनी आपण देवेंद्र फडणवीसांमुळंच खासदार झाल्याचं वक्तव्य केलं. 2019 ची लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपनं युतीत लढवली. या निवडणुकीत नवनीत राणांच्या विरोधात होते शिवसेनेचे आनंदराव अडसूळ. निवडणुकीत नवनीत राणांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा जिंकल्या. त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांचा पराभव केला. आता फडणवीसांमुळं आपण खासदार झाले असं विधान नवनीत राणांनी केल्यानं फडणवीसांनीही शिवसेनेच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला मदत केली का असा प्रश्न निर्माण झालाय.

Published on: Aug 22, 2022 02:05 AM