‘विधानसभा लढतोय आणि मीच…’, नवाब मलिक अपक्ष लढण्यावर ठाम, पण फायदा कोणाचा?

| Updated on: Oct 27, 2024 | 11:57 AM

नवाब मलिकांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी नाकारली तर त्यांच्या मुलीला सना मलिक यांना विधानसभेचं तिकीट महायुतीकडून देण्यात आलं. यानंतर आता नवाब मलिक हे अपक्ष लढणार असल्यावर ठाम आहेत. ते मानखुर्द शिवाजी नगर विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अजित पवार यांच्या गटाच्या विनंतीला नकार देत ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

Follow us on

जवळपास दोन वर्षांनंतर राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे माध्यमांशी बोलले. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटाची विनंती अमान्य करत नवाब मलिक हे मानखुर्द शिवाजी नगर विधानसभेतून अपक्ष अर्ज भरणार असून ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. अजित पवारांच्या नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेऊन निवडणूक न लढण्याची विनंती केली होती. मात्र नवाब मलिक अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे आता त्यांचा विधानसभेचा मुकाबला मविआचे घटक पक्ष असलेल्या सपाच्या अबू अझमींशी होणार आहे. नवाब मलिक यांना भाजपमध्ये घेण्यात भाजपचा विरोध आहे. कारण भाजपने नवाब मलिक यांच्यावर विविध आरोप केले होते. मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी मलिक हे अनेकदा अजित पवारांना भेटले. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिक यांच्या मुलीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अणुशक्तीनगर येथून निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. म्हणजेच मलिकांची मुलगी आता एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीची उमेदवार असणार आहे. मात्र नवाब मलिक आता अपक्ष लढणार आहेत. तर त्यांचा मुकाबला महायुतीशी नाहीतर महाविकास आघाडीशी होणार आहे.