नवाब मलिक यांना धक्का; न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची बदली, जामीनाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर
दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी मलिक सध्या अटकेत आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले असले तरिही त्यांना अजुनही जामीन मिळालेला नाही. आतातर त्यांच्या जामीनावर लवकर सुनावणी होईल असे वाटत नाही. कारण त्यांची सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठासमोर सुरू असतानाच आता न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांची बदली झाली आहे. त्यांची गोवा खंडपीठात बदली झाल्याने मलिक यांना पुन्हा नव्या कोर्टाकडे जावं लागेल. तर मुंबई उच्च न्यायालयात मलिकांना आता नव्या बेंचपुढे दाद मागावी लागणार आहे. दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी मलिक सध्या अटकेत आहेत.
Published on: Mar 06, 2023 06:11 PM
Latest Videos