भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अविश्वास ठरावाबाबतचं भाष्य केलं होतं. त्यावरून नवाब मलिक यांनी हा टोला लगावला आहे. तसेच भरती घोटाळ्याचे कनेक्शन विधानसभेत लवकरच उघड होतील असेही नवाब मलिक म्हणाले. महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे त्यामुळे हिंमत असेल तर भाजपने सरकारवर अविश्वास ठराव आणावा म्हणजे त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहे हे समजेल, असा टोला मलिक यांनी लगावला आहे. ओबीसी आरक्षणावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करताना हे विधान केलं होतं.