‘तुम्हाला आणि सहकाऱ्यांना किंमत’, अजित पवार गटातील एका मंत्र्याला नक्षलवाद्यांची धमकी,
याच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, मंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री छगन भुजबळ यांनाही धमकी मिळाली आहे. या धमक्यांप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. याचदरम्यान आता आणखी एका मंत्र्याला धमकी आल्याचं समोर आलं आहे.
रायगड, 20 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्याती मंत्र्यांना धमकी येण्याचे सत्र सुरूच आहे. याच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, मंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री छगन भुजबळ यांनाही धमकी मिळाली आहे. या धमक्यांप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. याचदरम्यान आता आणखी एका मंत्र्याला धमकी आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात गोंधळ होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटात गेलेले राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. याच्या आधी देखील त्यांना सूरजागड लोह प्रकल्पावरून हिवाळी अधिवेशन सुरू असताना धमकी देण्यात आली होती. आता पुन्हा एखदा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. यावेळी नक्षलवाद्यांनी यांना एक पत्र पाठवत त्यांना तुम्हाला आणि सहकाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल असं म्हटलं आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, नक्षल्यांच्या या धमकिची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून तपास केला जात आहे.