एनसीसीच्या अमानुष मारहाण झालेले विद्यार्थ्यी म्हणतात, ‘सर्व प्रकार चुकीच्या...’

एनसीसीच्या अमानुष मारहाण झालेले विद्यार्थ्यी म्हणतात, ‘सर्व प्रकार चुकीच्या…’

| Updated on: Aug 09, 2023 | 7:57 AM

त्यानंतर या प्रकरणामुळे अधिवेशन देखील गाजले होते. तर यानंतर मारहान करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

ठाणे, 9 ऑगस्ट 2023 । येथील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोकं ठेवायला लावून त्यांना काठीने माराहान झाली होती. त्यानंतर या प्रकरणामुळे अधिवेशन देखील गाजले होते. तर यानंतर मारहान करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता यावर मारहान झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर झालेल्या मारहानीबद्दल कोणताही आक्षेप नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हा सर्व प्रकार चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला असून प्रशिक्षणावर आम्हाला कोणताही आक्षेप नसल्याचेही त्याविद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 09, 2023 07:56 AM