सुप्रिया सुळे यांच्या हकालपट्टीच्या प्रश्नावर अजित पवार पत्रकारावर भडकले? म्हणाले …
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर राज्यातील राष्ट्रवादी पक्षात अनेक उलथापालथ झाली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मागणीवरून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडानंतर अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर राज्यातील राष्ट्रवादी पक्षात अनेक उलथापालथ झाली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मागणीवरून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तर त्यानंतर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या पदावरून हटवले. हे हटवाहटवीचे प्रकरण थेट सुप्रिया सुळे यांच्या नावापर्यंत गेल्याने अजित पवार चांगलेच भडकले. पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी होणार का असा सवाल पत्रकाराने केला. त्यावर प्रफुल्ल पटेल उत्तर देत असतानाच, अजित पवार यांनी, हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष चाललेला नाही. आम्ही पक्ष वाढीचं काम करत आहोत. आम्ही येथे कुणाचीही हकालपट्टी करण्यासाठी बसलो नाही असं उत्तर दिलं. तर आम्ही म्हणजेच पक्ष आहोत असा पुन्हा एकदा त्यांनी म्हणत राष्ट्रवादीवर आपला दावा सांगितला.