अजित पवारांचा मिमिक्रीतून विरोधकांवर निशाणा, दादांनी काढला थेट बाप अन्…

| Updated on: Nov 11, 2024 | 10:34 AM

अजित पवार यांच्या विधानांवरून सध्या अनेक वार पटलवार रंगले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आश्वासन दिलेल्या २५ लाखांच्या विम्यावर अजित पवारांनी टीका केली. त्यावरून सुरू झालेला वाद हा काका आणि बापापर्यंत येऊन पोहोचलाय.

अजित पवार यांच्या विधानांवरून सध्या अनेक वार पटलवार रंगले आहेत. राज ठाकरेंना नकलाकार म्हणारे अजित पवार स्वतःच सध्या नकलांच्या प्रेमात पडलेत आणि दादा आता विरोधकांवर तुटून पडलेत. मविआने २५ लाखांच्या विमाचा वायदा केल्यानंतर अजित पवारांनी विरोधकांचा बाप काढला. त्याला प्रत्युत्तर देताना बाप नव्हे तर तुमचा काकांचा या योजना पूर्ण करून दाखवेल, असं म्हणत जयंत पाटलांनी पलटवार केलाय. तर बारामतीमध्ये शरद पवार निवृत्त झाल्यानंतर हाच पठ्ठ्या तुमचं काम करणार तिथे दुसऱ्या कोणाचा घास नाही, असं वक्तव्यही अजित पवारांनी केलं. त्यावरूनही अजित पवारांना विरोधकांनी घेरलंय. तर दुसरीकडे कारखाना बंद पाडण्यावरूनही दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताय. अजित पवार यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी सध्या जयंत पाटील आणि रामराजे निंबाळकर आहेत. मात्र यंदा अजित पवार मिमिक्रीतून विरोधकांवर निशाणा साधताय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 11, 2024 10:34 AM
मुंबईत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा; किंमत ऐकून बसेल धक्का
भाजप खासदाराची ‘लाडक्या बहिणीं’ना दमदाटी अन् महायुती सरकारची कोंडी