'या' प्रश्नावर उद्या विधासभेत आवाज उठवणार; अजित पवार यांचं महत्वाचं वक्तव्य

‘या’ प्रश्नावर उद्या विधासभेत आवाज उठवणार; अजित पवार यांचं महत्वाचं वक्तव्य

| Updated on: Mar 07, 2023 | 12:14 PM

Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर भाष्य केलं. तसंच आज साजऱ्या होणाऱ्या होळीवरही त्यांनी भाष्य केलंय.

अहमदनगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर भाष्य केलं. “अवकाळी पाऊस पडेल हे हवामान खात्यानं सांगितलं. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय. निफाड भागात मोठ्या प्रमाणात पाऊस, अनके पिकांचं नुकसान झालं आहे. गहू आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं. आम्ही उद्या सभागृहात आवाज उठवणार आहोत”, असं अजित पवार म्हणालेत. “समाजातील वाईट भावना दूर होण्यासाठी काल आपण होळी साजरी केली. कोरोनाचं सावट आलं. त्यावेळी मोठी किंमत मोजावी लागली. यंदा सण चांगला साजरा झाला याचा आनंद आहे”, असं अजित पवार म्हणालेत.

Published on: Mar 07, 2023 12:14 PM