Sharad Pawar News : भुजबळ, तटकरे, वळसे पाटील यांच्या प्रश्नाचा शरद पवार यांनी निकालच लावला, पहा काय म्हणाले?
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तर त्यांना बंडखोरी करण्यात प्रफुल पटेल छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांनी मदत केली.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यामुळे सध्या राज्याचं राजकार ढवळून निघालं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तर त्यांना बंडखोरी करण्यात प्रफुल पटेल छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांनी मदत केली. यावरून ज्यांना शरद पवार यांनी भरभरून दिलं त्यांनीच विश्वास घात केला. याच दुःख वाटतं का असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी काही शब्दातच विषय संपवला. त्यांनी त्यांच्या जाण्यानं आपल्याला दुःख वाटत नाही. तर हे होतच राहतं पण याचे परिणाम हे दितातच. या सर्वावर उत्तर सामान्य मतदार देतो. आणि आपला विश्वास हा त्याच मतदारांवर असल्याचं म्हटलं आहे.
Published on: Jul 03, 2023 05:30 PM
Latest Videos