अजित पवार यांच्या मंत्र्यांना खाती देणाऱ्यावरून शिंदे गटात मतमतांतर? अमोल मिटकरी यांनी स्पष्टच सांगितलं...

अजित पवार यांच्या मंत्र्यांना खाती देणाऱ्यावरून शिंदे गटात मतमतांतर? अमोल मिटकरी यांनी स्पष्टच सांगितलं…

| Updated on: Jul 05, 2023 | 8:05 AM

अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर ते आणि त्यांचा समर्थक गट हा शिंदे-भाजप युतीबरोबर गेला आहे. त्यामुळे ज्यांच्यामुळे शिवसेना सोडावी लागली त्या शिंदे गटाची आता अडचण झाली आहे. तर ज्यांच्यावर टीका केली आता त्यांच्याच मांडीला मांडी कशी लावून बसायचं असा सवाल काही शिंदे गटातील आमदारांनीच बोलून दाखवला आहे.

मुंबई : गेल्या दोन एक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड हालचाली पहायला मिळत आहेत. येथे अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर ते आणि त्यांचा समर्थक गट हा शिंदे-भाजप युतीबरोबर गेला आहे. त्यामुळे ज्यांच्यामुळे शिवसेना सोडावी लागली त्या शिंदे गटाची आता अडचण झाली आहे. तर ज्यांच्यावर टीका केली आता त्यांच्याच मांडीला मांडी कशी लावून बसायचं असा सवाल काही शिंदे गटातील आमदारांनीच बोलून दाखवला आहे. तर आता शिंदे गटाकडून अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला खाते वाटपावरून विरोध होताना दिसत आहे. यातून राष्ट्रवादीला महत्वाची काती देऊ नये यासाठी वर्षा निवासस्थानी शिंदे गटाच्या बैठका होत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, याबाबत अजित पवार यांनी आधीच स्पष्ट सांगितलं आहे की खाती वाटपात काही मतमतांतर असू शकतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य निर्णय घेतील.

Published on: Jul 05, 2023 08:05 AM