Ajit Pawar News : अजित पवार यांच्यासह इतर 8 आमदारांबाबत जयंत पाटील याचं मोठं वक्तव्य, म्हणाले….
आपल्या सोबत 30 एक आमदाराच्या पाठिंबा घेत बंड केलं. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जात सत्ताप्रवेश केला. ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता संघर्ष समोर आला आहे. तर अजित पवार यांच्या या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवार यांनी काल काही आमदारांची बैठक बोलावली आणि थेट पक्षाविरूद्धच निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सोबत 30 एक आमदाराच्या पाठिंबा घेत बंड केलं. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जात सत्ताप्रवेश केला. ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता संघर्ष समोर आला आहे. तर अजित पवार यांच्या या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे. तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगितला आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं पाऊल उलल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनीच प्रसार माध्यमांना माहिती देताना, अजित पवार आणि इतर 8 आमदारांनी पक्षाच्या धोरणाविरोधात कृती केली आहे. त्यांनी भाजपबरोबर जाऊन शपथविधी आटोपला आहे. त्यावरून आपण विधानसभा अध्यक्षांकडे या 9 जणांना अपात्र ठरवण्याबाबत याचिका दाखल केली आहे. तर ती त्यांनी मिळाली असून त्यावर आम्हाला आमचं म्हणं माडण्यासाठी वेळ देण्यात यावा अशी मागणी केल्याचे ते म्हणाले आहे.