अजित पवार यांनी केला जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम; प्रफुल्ल पटेल यांनी केली हकालपट्टी
आपला पहिला हाथ हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांच्यावर फिरवत त्यांचा करेक्ट कार्यक्रमच केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मागणीवरून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी आपली खेळी खेळली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद चिघळला आहे. येथे अजित पवार यांनी पक्षावर आपला हक्क सांगत पक्षातून अनेकांची हकालपट्टी करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी आपला पहिला हाथ हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांच्यावर फिरवत त्यांचा करेक्ट कार्यक्रमच केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मागणीवरून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी आपली खेळी खेळली. त्यांनी आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या पदावरून हटवल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तर प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत माहिती देताना, मी जयंत पाटलांना अधिकृतरित्या कळवलं आहे की, प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना मुक्त करतो. त्यांच्याजागी सुनिल तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहे.