शरद पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह, या बड्या नेत्याला दिला पक्षात प्रवेश

शरद पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह, या बड्या नेत्याला दिला पक्षात प्रवेश

| Updated on: Oct 28, 2023 | 11:07 PM

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात मोठा दणका दिलाय. एकीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. मात्र, शरद पवार यांनी माजी आमदाराला स्वगृही परत आणलंय.

शहापूर | 28 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच ठाणे जिल्ह्यात मोठा झटका बसलाय. शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पहिला शह दिलाय. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्याचे शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रवेश केला. मुंबई येथे प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा पक्षप्रवेश झाला. बरोरा यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर 10 महिन्यापूर्वी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. मात्र, पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर आमदारकीचे तिकीट घेण्यासाठी त्यांनी पुन्हा घर वापसी केली अशी चर्चा आहे.

Published on: Oct 28, 2023 11:07 PM