‘सत्तासंघर्षाचा निकाल जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जितेंद्र आव्हाड करणार ‘हा’ उपक्रम; म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सोमवारी व्हाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे प्रेझेंटेशन मांडलं. या कार्यक्रमात शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सोमवारी व्हाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे प्रेझेंटेशन मांडलं. या कार्यक्रमात शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रयत्न मी करत आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी, मी जंयत पाटील यांच्याशी बोलून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 50 हजार पुस्तकं छापणार आहे, 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीनं 50 हजार पुस्तकं छापणार, कारण हे जनतेपर्यंत पोहचलं तर कर्नाटकापेक्षा भंयकर निकाल महाराष्ट्रात लागेल दोनशे पेक्षा कमी मतांनी आपण येणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Published on: May 30, 2023 09:59 AM
Latest Videos