राज्याच्या राजकारणात कोण सरस? अजित पवार की शरद पवार? राष्ट्रवादीचे आमदार कोणाला साथ देणार?
तर राष्ट्रवादी नेमकी कोणाची? अजित पवार यांची की शरद पवार यांची? कोणाकडे किती आमदार आहेत हे देखिल अजून समजून शकलेले नाही. मात्र आज यासंदर्भात दोन्ही गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले असून कोणाचे पारडे जड याचे चित्र आज स्पष्ट होईल
मुंबई : राज्यातील राजकारणात अजित पवार यांच्या बंडामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या या बंडामुळे राज्यातील सगळी समिकरणांत बदलाव पहायला मिळत आहे.तर राष्ट्रवादी नेमकी कोणाची? अजित पवार यांची की शरद पवार यांची? कोणाकडे किती आमदार आहेत हे देखिल अजून समजून शकलेले नाही. मात्र आज यासंदर्भात दोन्ही गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले असून कोणाचे पारडे जड याचे चित्र आज स्पष्ट होईल. अजित पवार यांच्याकडून भुजबळ सिटीत मेळावा घेण्यात येणार आहे. तर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार हे आमदार आणि खासदारांशी संपर्क साधणार आहेत. तर दोन्ही गटाकडून आमदार आणि खासदार यांना व्हीप बजावण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या दोन्ही गटाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Jul 05, 2023 09:40 AM
Latest Videos