राहुल गांधी आणि एमके स्टॅलिन यांचा NCP च्या बड्या नेत्याला फोन? अध्यक्ष निवडीशी काय संबंध?

राहुल गांधी आणि एमके स्टॅलिन यांचा NCP च्या बड्या नेत्याला फोन? अध्यक्ष निवडीशी काय संबंध?

| Updated on: May 04, 2023 | 8:56 AM

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. अशातच काँग्रेसच्या आणि तामिळनाडू येथून बड्यानेत्याचा सुप्रिया सुळे यांना थेट फोन आल्याने उलटसुलट चर्चांना उधान आलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला आहे. तर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. अशातच काँग्रेसच्या आणि तामिळनाडू येथून बड्यानेत्याचा सुप्रिया सुळे यांना थेट फोन आल्याने उलटसुलट चर्चांना उधान आलं आहे. सुप्रिया सुळे यांना राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शरद पवार यांच्या निर्णयासंदर्भात फोन केल्याचे कळत आहे. तसेच राहुल गांधी यांनी शरद पवार यांना आपला राजीनामा मागे घ्यावा, निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती केली आहे.

Published on: May 04, 2023 08:56 AM