आनंद दिघेंवरुन ठाण्यात राजकारण पेटलं; नरेश म्हस्के यांच्या 'त्या' टीकेवर राष्ट्रवादीचा पलटवार

आनंद दिघेंवरुन ठाण्यात राजकारण पेटलं; नरेश म्हस्के यांच्या ‘त्या’ टीकेवर राष्ट्रवादीचा पलटवार

| Updated on: Jun 08, 2023 | 8:30 AM

धर्मवीर आनंद दिघे यांना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवार यांनी मदत केली होती, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यामुळे शिवसेनेकडून आव्हाडांवर टीका केली जात आहे. आता शिवसेनेच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवार यांनी मदत केली होती, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यामुळे शिवसेनेकडून आव्हाडांवर टीका केली जात आहे. आता शिवसेनेच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “गेले दोन दिवस जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी कालची पत्रकार परिषद ऐकत असताना, धर्मवीर आनंद दिघे यांना शरद पवार यांनी टाडा लावला का? जामीन देताना शरद पवार हे न्यायाधीश होते का? असे सवाल उपस्थित करुन पुन्हा एकदा आपली बौद्धीक दळिद्रीपणाचे दर्शन जगाला घडविले आहे”, असे आनंद परांजपे म्हणाले.दरम्यान, “नरेश म्हस्के यांना आपण थेट सवाल करत आहोत की, धर्मकार्य करताना जे नैतिक अधिष्ठान अंगी असावे लागते; ते आनंद दिघे यांचे नाव घेणाऱ्या म्हस्के यांच्या अंगी आहे का? क्षणभर विश्रांतीमध्ये ज्यांनी आपल्या निष्ठेचा शर्ट उतरवला होता. त्यांची आनंद दिघे यांचे नाव घेण्याची लायकी आहे का?”, अशा शब्दात परांजपे यांनी नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेवर पलटवार केला.

Published on: Jun 08, 2023 08:30 AM