अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर म्हणतात…
तर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर त्याच्या काही आमदारांनीही काल मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अनेकांची गोची झाली आहे. त्यात जे थेट विरोधात जे बालायचे आता काय बोलायचं असाच सवाल त्यांच्यासमोर उभा झाला आहे.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील आघाडीत काल प्रवेश केला. तर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर त्याच्या काही आमदारांनीही काल मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अनेकांची गोची झाली आहे. त्यात जे थेट विरोधात जे बालायचे आता काय बोलायचं असाच सवाल त्यांच्यासमोर उभा झाला आहे. त्यात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे ही आहेत. गोपीचंद पडळकर यांनी बारामतीत जाऊन अनेक वेळा पवार कुटूंबीयांवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय असणार याची उत्सुकता अनेकांना होती. त्यानंतर आता यावर गोपीचंद पडळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम हे देशभर चालू आहे. त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा दिल्लीपासून गावापर्यंत वाहतेय. त्यामुळेच अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांचा पक्ष की त्यांचा गट हे माहित नाही. पण ते भारतीय जनता पार्टी सोबत आलेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. शुभेच्छा देतो असेही पडळकर यांनी म्हटलं आहे.