‘दादा म्हणजे नको असणारी सासूच शिंदे यांच्या वाट्याला’; ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा टोला

‘दादा म्हणजे नको असणारी सासूच शिंदे यांच्या वाट्याला’; ठाकरे गटाच्या महिला नेत्याचा टोला

| Updated on: Jul 15, 2023 | 9:27 AM

त्यांनी अजित पवार यांच्या रूपाने नको असणारी सासू आता शिंदे गटांच्या वाट्याला आलीय. त्यामुळे राष्ट्रवादीमुळे हिंदुत्व धोक्यात आले असे म्हणत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटांनी राजकीय नेत्यांनी नीतिमत्ता गमावलीय का असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केलाय.

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याचे अर्थ खातं गेलं आहे. त्यामुळे हा शिंदे गटाच्या विरोधाला धक्का मानला जत आहे. तर यावरूनच शिंदे गटावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशीच टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्यांनी अजित पवार यांच्या रूपाने नको असणारी सासू आता शिंदे गटांच्या वाट्याला आलीय. त्यामुळे राष्ट्रवादीमुळे हिंदुत्व धोक्यात आले असे म्हणत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटांनी राजकीय नेत्यांनी नीतिमत्ता गमावलीय का असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केलाय. तर दादांसारखे अनुभवी माणसाकडे अर्थखातं जाणार असेल तर दादांचा अभिनंदन असेही त्यांनी म्हटलं आहे. तर या निमित्ताने राजकीय नैतिकता हरवली आहे का हा एक नवा प्रश्न तयार होतो कारण आमच्याकडून गेलेली जी आमची चाळीस चुकार भावंड आहेत, त्यांनी जाताना कारण सांगितलं होतं की राष्ट्रवादीसोबत गेल्याने आमचे हिंदुत्व धोक्यात येत आहे. मग आता त्यांना आता काहीही प्रॉब्लेम नाहीये का? की आता कोणतं प्रोटीन कव्हर त्यांनी मिळालं आहे. शिंदे गटातील नेत्यांची राजकीय नैतिकता हरवलेली आहे. नैतिकतेचा कुठलाही आधार यांच्याकडे नाहीये, सत्तेसाठी वाटेल ती तडजोड हे सगळे करू शकतात अशी टीका केली आहे.

Published on: Jul 15, 2023 09:27 AM