राष्ट्रवादीतून बडतर्फ नेत्याचा हल्लाबोल; म्हणाला, यात खडसेंचा हात
यावरून त्यांनी आता थेट आपला मोर्चा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे वळवला आहे. तसेच त्यांच्यावर हल्लाबोल करताना आरोप केला आहे की त्यांच्या बडतर्फीच्या कारवाईत खडसे यांचा हात आहे.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगावचे नेते आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. यावरून त्यांनी आता थेट आपला मोर्चा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे वळवला आहे. तसेच त्यांच्यावर हल्लाबोल करताना आरोप केला आहे की त्यांच्या बडतर्फीच्या कारवाईत खडसे यांचा हात आहे. तसेच त्यांनी खडसे तसंच जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आपल्याविषयी तक्रार केल्यामुळे बडतर्फीची कारवाई करण्यात आली. बडतर्फीची कारवाई हे कट कारस्थान या दोन्ही नेत्यांचा असल्याचा खळबळजनक आरोप पवार यांनी केले आहेत. तर अजित पवार यांचे आपण कट्टर समर्थक आहोत म्हणूनच जिल्ह्यातील नेते माझ्याविरुद्ध कट कारस्थान करत असल्याचा आरोपही पवार यांनी केलाय. धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व भाजपसोबत ते गेले. तसेच भाजपचा पाठिंबा घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत केले. यासह भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांचे एकत्र फोटो असलेली जाहिरात दिली. यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. आहे.