BhauBeej 2023 : पहिल्यांदाच जयंत पाटील यांच्या ऐवजी रुपाली चाकणकर यांनी कुणाचं केलं औक्षण?
गेल्या अनेक वर्षांपासून जयंत पाटील हे रूपाली चाकणकर यांच्याकडे न चुकता भाऊबीजेसाठी येतात. मात्र पण यंदा त्यांना डेंग्यूची लागण झाल्याने यावर्षी ते रूपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी येऊ शकले नाही. मात्र जवानांसह साजरा करण्यात येणाऱ्या भाऊबीज सोहळ्याला चाकणकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांना ओवाळणी केली.
पुणे, १५ नोव्हेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बहिण भावाचं नातं सर्वश्रूत आहे. मात्र आणखी एक बहीण-भावाच नातं समोर आलं असून ते आहे जयंत पाटील आणि रुपाली चाकणकर. दरवर्षी भाऊबीज निमित्त जयंत पाटील हे रूपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी येतात. गेल्या अनेक वर्षांपासून जयंत पाटील हे रूपाली चाकणकर यांच्याकडे न चुकता भाऊबीजेसाठी येतात. मात्र पण यंदा त्यांना डेंग्यूची लागण झाल्याने यावर्षी ते रूपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी येऊ शकले नाही. मात्र जवानांसह साजरा करण्यात येणाऱ्या भाऊबीज सोहळ्याला चाकणकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांना ओवाळणी केली. सध्या जयंत पाटील आणि रूपाली चाकणकर हे वेगवेगळ्या गटात आहेत. असे असले तरी त्यांच्या बहिण भावाचं नातं कायम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्या म्हणाल्या “आज माझे बंधू जयंत पाटील आजारी असल्यामुळे भाऊबीजेला येऊ शकले नाहीत. पण त्यांनी मला फोनवरून भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जयंत दादा पाटील लवकरच बरे होतील अशा शुभेच्छा रुपाली चाकणकर यांनी दिल्यात.