अण्णा हजारे यांच्यामुळे देशाचं वाटोळं… जितेंद्र आव्हाड यांनी केली बदनामी, ‘त्या’ नोटीसीला काय दिलं उत्तर?

| Updated on: Dec 14, 2023 | 6:40 PM

अण्णा हजारे यांची बदनामी केल्याप्रकरणी अण्णा हजारे यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी अण्णा हजारे यांच्यातर्फे अण्णा हजारे यांची बदनामी केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नोटीसीला जितेंद्र आव्हाड यांनी काय दिलं उत्तर ? अण्णा हजारे यांच्या वकिलांनी दिली माहिती

पुणे, १४ डिसेंबर २०२३ : अण्णा हजारे यांच्यामुळे देशाचं वाटोळं झालं, गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही, असे बदनामी करणारं वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो प्रसिद्ध करून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर केले होते. यानंतर अण्णा हजारे यांची बदनामी केल्याप्रकरणी अण्णा हजारे यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी अण्णा हजारे यांच्यातर्फे अण्णा हजारे यांची बदनामी केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. दरम्यान अॅड. पवार यांच्या कायदेशीर नोटिशीला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वकीलांमार्फत उत्तर दिले आहे. यासंदर्भातील माहिती अण्णा हजारे यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी दिली आहे. अण्णा हजारे यांच्यामुळे जनलोकपाल, लोकायुक्त कायदा अंमलात आला हे सपशेल खोटं आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी कळविले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 14, 2023 06:33 PM
मराठा आरक्षण न मिळण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार; कुणाचा गंभीर आरोप?
अशी यात्रा कधी पाहिलीये? जिथं देव-दानवांच्या युद्धाचा रंगतो थरार