जितेंद्र आव्हाड यांचं पोलिसांना भावनिक पत्र; उद्विग्न होत म्हणाले…
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना भावनिक पत्र लिहिलं आहे. पाहा...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना भावनिक पत्र लिहिलं आहे. ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना त्यांनी पत्र लिहिलंय. माझ्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला जातोय, असं आव्हाड आपल्या पत्रात म्हणाले आहेत. महेश आहेर संघटित गुन्हेगारीचा म्होरक्या असल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय. त्यामुळे महेश आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती आव्हाडांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान, ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आव्हाडांवर आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on: Feb 16, 2023 09:41 AM
Latest Videos