राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही : अमोल मिटकरी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिवप्रतिमा देताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांनी पायाचील चपला काढलेल्या नाहीत. त्यामुळे अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केला.
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपालांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यपालंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याची घटना समोर आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून याच्याआधी देखिल झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून असचं झालं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिवप्रतिमा देताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांनी पायाचील चपला काढलेल्या नाहीत. त्यामुळे अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केला. तसेच त्यांचा फोटो शेअर करत मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवही निशाणा साधला आहे.
तसेच राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्हीं महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलने करा . बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय.. पायात पायताण घालुन जर “शिवप्रतीमा” देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे? असं म्हटलं आहे.