Jitendra Awhad : वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणतात… मी ठाम
कोणीही काही आंदोलन करू द्या, मी माझ्या प्रश्नावरती ठाम असल्याचे आव्हाड म्हणाले. तसेच शिवाजी राजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याचं रक्षण मरेपर्यंत संभाजी महाराजांनी केलं. त्यामुळे स्वराज्य रक्षक होते, असंही आव्हाड यांनी म्हंटलं आहे.
ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्यापाठोपाठ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान करून राजकारण चांगलच तापवलं. यानंतर त्यांनी माध्यमांना आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटलं आहे.
याचबरोबर आव्हाड यांनी माध्यमांनी आपलं प्रतिक्रीया तोडून मोडून दाखवली असं म्हटलं आहे. तर आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगताना, औरंगजेब हा क्रूर होता त्याने आईला मारलं, बापाला मारलं पण त्याच्यासमोर महाराष्ट्र झुकला नाही. शिवाजी महाराज झुकले नाही, संभाजी महाराज झुकले नाहीत.
तर कोणीही काही आंदोलन करू द्या, मी माझ्या प्रश्नावरती ठाम असल्याचे आव्हाड म्हणाले. तसेच शिवाजी राजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याचं रक्षण मरेपर्यंत संभाजी महाराजांनी केलं. त्यामुळे स्वराज्य रक्षक होते, असंही आव्हाड यांनी म्हंटलं आहे.