Jitendra Awhad | भीक मागून शाळा सुरु केली, मध्यतंरी कुणीतरी बोललं : जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता पुन्हा एकदा सरस्वती देवी आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर बोलून वाद निर्माण करण्याचं काम केलं आहे. तर त्यांनी सरस्वती देवी शेजारी सावित्रीबाई फुले यांचा फोटो हा असायलाच हवा असे म्हटलं आहे
राज्यात सध्या वाद होताना दिसत आहेत. यादरम्यान आधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी. एका पाठोपाठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. यादरम्यान पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा वातावरण गरम होण्याची शक्यता आहे.
याच्या आधी आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता, त्याने विष्णूचं मंदीर पाडलं नाही. तर त्यानं संभाजी महाराजांना मारलं, पण शंभूराजांनी धर्माचा कोणता प्रसार केला आणि त्याच्यासाठी मृत्यू पत्करला हे मला मान्य नाही असं म्हटलं आहे. त्याचबरोबर शाळेत सरस्वती देवी शेजारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा फोटो हा असायलाच हवा.
तर मध्यंतरी कोणीतरी महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा सुरू केली असं म्हणालं होतं. मात्र फुले हे फार श्रीमंत होते, असेही आव्हाड यांनी म्हटलं आहे