पुणे पोटनिवडणुकीवर अजित पवार यांनी व्यक्त केली कसली शक्यता? म्हणाले, ‘मला एक बातमी’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील आगामी निवडणुकीबाबत आणि पुणे पोटनिवडणुकीवरून मोठं विधान केलं आहे. ते पुण्याच्या टिंबर मार्केटला भेट झालेल्या नुकसानीच्या पाहणीनंतर बोलत होते.
पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीसह युतीत देखील धुसफूस होताना दिसत आहे. याचदरम्यान पुणे पोटनिवडणुकीचा मद्दा पुन्हा एकदा वर आला आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे दुखःद निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्यातच आता राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीलाही एक दिड वर्ष शिल्लक राहिलं आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील आगामी निवडणुकीबाबत आणि पुणे पोटनिवडणुकीवरून मोठं विधान केलं आहे. ते पुण्याच्या टिंबर मार्केटला भेट झालेल्या नुकसानीच्या पाहणीनंतर बोलत होते. पवार म्हणाले की, ‘मला एक बातमी अशी कळाली आहे. मला वाटत होते की, लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिले, त्यामुळे पोट निवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी आतल्या गोटातील माहिती मला मिळाली.’ असे पवार यांनी म्हटलं आहे.