पंढरपुरात राष्ट्रवादीला खिंडार,  ‘हा’ नेता आता बीआरएसमध्ये प्रवेश करणार!

पंढरपुरात राष्ट्रवादीला खिंडार, ‘हा’ नेता आता बीआरएसमध्ये प्रवेश करणार!

| Updated on: Jun 25, 2023 | 4:30 PM

दोन दिवसांपूर्वी बीआरएस आणि वंचितला दुर्लक्षित करू नका असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं, अखेर याच बीआरएसने राष्ट्रवादीला पंढरपूरमध्ये मोठा धक्का दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भागीरथ भालेक पक्षामध्ये नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

सोलापूर : दोन दिवसांपूर्वी बीआरएस आणि वंचितला दुर्लक्षित करू नका असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं, अखेर याच बीआरएसने राष्ट्रवादीला पंढरपूरमध्ये मोठा धक्का दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भागीरथ भालेक पक्षामध्ये नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.भगीरथ भालके यांनी पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.हा राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह 27 जूनला पंढरपुरच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे. याचवेळी भगीरथ भालके हजारो कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.

 

Published on: Jun 25, 2023 04:30 PM